व्हिडिओ
RSS News : केंद्र सरकारने 58 वर्षांपूर्वीचे निर्बंध उठवले; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध होते. सरकारी कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. केंद्र सरकारने 58 वर्षांपूर्वीचे निर्बंध उठवले आहेत. निर्बंध उठवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसने मात्र जोरदार विरोध केला आहे. तर घटनाबाह्य आदेश रद्द केल्याचं भाजपने म्हटलेलं आहे.
त्यावरुन काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर भाजप आणि संघाच्या नात्यात कटूता आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला असेल.