Union Budget 2024: आयात शुल्क कमी केल्याने सोने-चांदीच्या दरात मोठी घट

आज बजेट सादर झालं त्यानंतर बजेटनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदी सरासरी 3 ते 5 हजारांनी स्वस्त झालेत.
Published by :
Team Lokshahi

आज बजेट सादर झालं त्यानंतर बजेटनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदी सरासरी 3 ते 5 हजारांनी स्वस्त झालेत. सीमाशुक्लातील कपातीच्या निर्णयानंतर दरात घसरण झालेली आहे. बजेटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात 6 टक्के कपातीचा निर्णय झाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात परिणाम जाणवत आहेत, कुठल्या शहरात सोने आणि चांदीचे काय दर आहेत जाणून घ्या.

मुंबईमधला दर हा 67 हजार 820 रुपये असा आहे. तर पुण्यात 67 हजार 830 रुपये असा दर आहे. तसेच नागपूरमध्ये 67 हजार 190 रुपये हा दर आहे. अमरावती आणि जळगावमध्ये 66 हजार 470 रुपये इतका दर आहे. तर यामुळे सोने खरेदीवर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com