Union Budget 2024 : सरकारचा टेम्पल टुरिझमवर भर; हिंदू, बौध्द, जैन धार्मिक स्थळांचा विकास करणार

मोदी सरकारचा टेम्पल टुरिझमवर भर पाहायला मिळत आहे. आज झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पनात पर्यटन क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारकडून पर्यटनाला चालना देण्याचा विचार केला गेला आहे.
Published by :
Team Lokshahi

मोदी सरकारचा टेम्पल टुरिझमवर भर पाहायला मिळत आहे. आज झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पनात पर्यटन क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारकडून पर्यटनाला चालना देण्याचा विचार केला गेला आहे. ज्यामुळे पर्यटन क्षेत्राला रोजगाराची संधी मिळाली आहे. हिंदू, बौध्द आणि जैन धार्मिक स्थळांचा विकास केला जाणार आहे.

काशी विश्वनाथच्या धरतीवर बिहारमध्ये मंदिरांचा विकास विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर बिहारमध्ये विष्णूपाद मंदिर महाबोधी कॉरीडॉरची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ओडिशामध्ये देखील पर्यटन वाढीसाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com