Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट

उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. आगामी विधानसभेच्या बाबत ते कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देखील चर्चा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे देखील दिल्लीला जाणार आहेत त्यामुळे हे तीन दिवस जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये असतील तेव्हा ते नेमके कोणत्या नेत्यांची भेट घेणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभेमध्ये सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या तर आता येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर राज्यामध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरु होण्याआधीच उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत आणि त्याठिकाणी कॉंग्रेसच्या पक्षनेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com