व्हिडिओ
जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' विधानावर उदयनराजे म्हणाले, युगपुरुषांबद्दल कोणीही...
जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा : राम मांसाहारी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रभू श्रीराम आणि कोणत्याही युगपुरुषाबद्दल कोणीही विधान करू नये आणि अशी युग पुरुषांबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे. कारण नसताना राजकरण करत मतभेद निर्माण केले जात आहेत त्यात विकृती पण आहे. यावेळी संत किंवा युगपुरुष हे कधी मांसाहारी होते का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करत असं बोलणे ही मोठी शोकांतिका आहे, असं देखील उदयनराजेंनी म्हंटले आहे.