Uday Samant: अजित पवारांकडून पुन्हा बारामतीतून न लढण्याचे संकेत, उदय सामंतांची प्रतिक्रिया
अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिले आहेत. बारामतीमध्ये जो उमेदवार देईन त्याला मी आहे असं समजून निवडून द्या. कार्यकर्तांसोबत संवाद सादत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्तांचा मात्र गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अजित पवार जे बारामतीमधून निवडून येतात ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत.
मात्र मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे पण मागच्या लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती मतदार संघातून त्यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बारामतीमधून लढणार नाही, बारामतीला कोणता तरी दुसरा आमदार भेटला पहिजे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होत आणि आता पुन्हा एकदा त्यांनी तसे संकेत दिलेले आहेत.
यापार्श्वभूमीवर उदय सामंत म्हणाले, अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते आमच्या महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. ते स्वतः राष्ट्रवादी पार्टी चालवतात त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी शिवसेनेचा मंत्री म्हणून बोलण योग्य नाही. ते जे काही बोलत असतील ते त्यांच्या पक्षाच्या संदर्भात बोलत असतील त्यांच्या बोलण्यावर टीका करण हे आमच्या दृष्टीने योग्य नाही.