व्हिडिओ
तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. अनियमित वर्तन केल्याबद्दल अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी डेरेक ओब्रायन यांना निलंबित केले आहे.
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. दोन तरुणांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात शिरून सुरक्षाभंग केल्याप्रकरणी ओब्रायन यांनी या घटनेवर चर्चेची मागणी केली होती. यावेळी झालेल्या गदारोळानंतर अनियमित वर्तन केल्याबद्दल अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी डेरेक ओब्रायन यांना निलंबित केले आहे.