व्हिडिओ
Manoj Jarange Patil: "मला ते 100 टक्के अटक करतील..."
मराठा आंदोलन शांतेत केलं तरीही गुन्हे दाखल केले आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आंदोलन शांततेत केलं तरीही गुन्हे दाखल केले आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सध्याची दडपशाही इंग्रजांपेक्षाही भयानक आहे. गृहमंत्र्यांचा मोठ्या प्रमाणत जातीयवाद सुरू असल्याचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे. मला 100 टक्के अटक करणार आहे, कारण मी शेतकऱ्याचा पोर आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठी व्हावी यासाठी मी लढत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.
तर ओबीसीमधून आरक्षण द्या, ही मागणी कायम असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी कालपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे आणि त्यानंतर सुद्धा गृहविभागावर आरोप चालूच ठेवल्याचं दिसत आहे.