व्हिडिओ
Gokhale Bridge: गोखले पुलाच्या बांधकामात चूक झालीच नाही, आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती
गोखले पुलाच्या बांधकामात चूक झालीच नाही अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची दिली आहे.
गोखले पुलाच्या बांधकामात चूक झालीच नाही अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची दिली आहे. रेल्वेच्या नव्या नियमानुसार पुलाचं बांधकाम केल्याने पुलाची उंची अधिक आहे. उर्वरित काम आधीच पूर्ण झालं होतं नंतर रेल्वे ट्रॅकवरील पुलाचं काम महापालिकेकडे आलं असं इक्बाल सिंह म्हणाले.
विक्रमी 14 महिन्यांत गोखले पुलाचं काम पूर्ण केलं असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंनी पुलाच्या बांधकामासंदर्भात टीका केलेली होती, यावर इक्बाल सिंह चहल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.