Sanjay Raut: मविआत कोणतेही मतभेद नाहीत, संजय राऊत वर्षा गायकवाड म्हणाले...

तिन्ही पक्ष मविआ म्हणून एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं संजय राऊत म्हणातात. मविआत सर्वकाही सुरळीत आहे असं संजय राऊत म्हणाले.
Published by :
Dhanshree Shintre

तिन्ही पक्ष मविआ म्हणून एकत्रित निवडणूक लढणार असल्याचं संजय राऊत म्हणातात. मविआत सर्वकाही सुरळीत आहे असं संजय राऊत म्हणाले. कोणत्याही पद्धतीत खोके सरकारला घालवायचं आहे असंही राऊतांनी म्हटलं आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय एक पक्ष जाहीर करणार नाही तसं केल्यास चार भिंतींच्या आत जे ठरलं त्या कराराचं उल्लंघन होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आपल्यामध्ये कोणतीही मतभेद नाहीयेत जागावाटपासंदर्भात असतील किंवा अन्य विषयांवर असतील, आणि सर्वकाही सुरळीत चालू आहे. देशामधील एकमेव आघाडी असेल ते तिन्ही पक्ष सांगतायेत की सर्वकाही सुरळीत चालू आहे. आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही म्हत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही म्हणजे चार भिंतींत जे ठरलं आहे त्या कराराचा उल्लंघन केल्यासारखं होईल ते सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे. फार ओढाताण करायचे नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून खोके सरकार घालवायचं आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचे आहे असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com