व्हिडिओ
Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील 94 मतदारसंघांचा समावेश आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील 94 मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार आहे. 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असेल.
7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार असून आता लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यातील ही निवडणूक मध्य प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा-नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये होणार आहे.