Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत 'या' दिवशी होणार सुनावणी

क्युरेटिव्ह याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यासाठी आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर 11 सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. क्युरेटिव्ह याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यासाठी आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

सरकारने सादर केलेली क्युरेटिव्ह याचिका प्रलंबित असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठाने या याचिकेवरील सुनावणी 11 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com