Thane : ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत.

ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली असून अनेक गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात दाखल झालेले दिसून येत आहेत. अनेक सिनेसृष्टीतील कलाकार व अनेक राजकीय नेते या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com