व्हिडिओ
Jalna lathi charge : जालना लाठीचार्जप्रकरणी ठाणे बंदची हाक
जालना लाठीचार्जप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात आज बंद पुकारण्यात आला आहे.
ठाणे: जालना लाठीचार्जप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात आज बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा मोर्चासह काँग्रेस, मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटानं हा बंद पुकारला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून 2 हजार अतिरिक्त पोलीस, दंगल नियंत्रण पथकांच्या 2 तुकड्या, राज्य राखीव दलाच्या 6 तुकड्या असा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. रास्ता रोको टाळण्यासाठी हायवे आणि अंतर्गत रस्त्यांवरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.