राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधी विरोधात ठाकरे गट हायकोर्टात

राज्यपाल कोट्यातील 12 आमदारांची यादी यापूर्वी न्यायप्रविष्ठ असतानाही पुन्हा नव्याने 7 आमदारांचा शपथविधी आज पार पडतोय.
Published by :
shweta walge

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी होणार आहे. महायुतीकडून ७ नावे निश्चित झाली असून दुपारी १२ वाजता आमदारांचा शपथविधी होईल. दरम्यान, या शपथविधी विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीविरोधात याचिका दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com