TET Exam 2024: टीईटी परीक्षेबाबत मोठा निर्णय

शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi

शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली असून, लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा आयोजित केली जाते. अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव परीक्षा परिषदेने राज्य शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ऑफलाइन किंवा प्रत्यक्ष लेखी परीक्षेचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com