व्हिडिओ
SSC & HSC Exam: दहावी, बारावीच्या संभाव्य वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप
दहावी, बारावीच्या संभाव्य वेळापत्रकावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांवर ताण येणार असल्याचं शिक्षक संघटनेचं मत आहे.
दहावी, बारावीच्या संभाव्य वेळापत्रकावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांवर ताण येणार असल्याचं शिक्षक संघटनेचं मत आहे. परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत यंदा 10 दिवस आधी आहे. तर परीक्षा 10 दिवस आधी होणार असल्याने नियोजन बिघडणार असल्याचा दावा आता शिक्षक संघटनेकडून करण्यात आला आहे.
राज्य शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. याचा परिणाम सराव परीक्षा आणि अभ्यास क्रमावर पडणार असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर दहावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.