व्हिडिओ
शिक्षकांना आता इलेक्शन ड्युटी, शिक्षकांचा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेतील किमान ५० टक्के शिक्षकांना या कामाला लावण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेतील किमान ५० टक्के शिक्षकांना या कामाला लावण्यात आले आहे. परीक्षांचे नियोजन तसेच रोजची ऑनलाइन माहिती भरण्याची कामे करावी लागतात त्यात निवडणुकीची कामे कशी केली जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरुन शिक्षकवर्गात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.
यामुळे आता मुंबईतील शिक्षकांनी निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यावर आज सोमवारी शिक्षक नेते व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे निवडणूक अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना भेटणार असून, शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी करणार आहेत.