Nahur News | नाहूरमध्ये हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, व्हिडीओ व्हायरल | Lokshahi Marathi

नाहूरमध्ये हिंदी भाषिक टीसीची दादागिरी पाहायला मिळत आहे. हिंदीत बोला मगच तिकिट देणार असं कर्मचाऱ्याने वक्तव्य केलं आहे. अमोल माने या प्रवाशाकडून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचाऱ्यने अमोल माने या प्रवाश्याशी केल्याचा आरोप मराठी एकीकरण समिती ने केला आहे.अमोल माने यांनी नाहूर स्थानकात लोकल चे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोलावे असे अमोल माने यांना सांगितले मात्र मराठीतच बोलणार असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईल मध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यानतंर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई ची मागणी मराठी एकीकरण समिती ने केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com