धाराशिवमध्येही महायुतीत बंडाचे वारे, तानाजी सावंत समर्थक आक्रमक

उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
Published by :
shweta walge

उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाऊन अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे समर्थक नाराज झाले असून त्यांनी वाशी येथे सामुहिक राजीनामे देत प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी केलीय.

धाराशिवमध्येही महायुतीत बंडाचे वारे, तानाजी सावंत समर्थक आक्रमक
उदयनराजे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार? काय म्हणाले पाहा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com