Talathi Bharti Scam : तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माईंड दत्ता नलावडेला अटक

तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माईंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माईंडला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दत्ता नलावडेला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र अखेर आता त्याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड दत्ता कडूबा नलावडे (२७, रा. भालगाव) हा तब्बल नऊ महिन्यांनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी सकाळी मिलकॉर्नर परिसरात निवांत फिरताना आढळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सप्टेंबरमध्ये शहरात तलाठी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले. तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, आता अखेर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com