स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढविणार : महेश खराडे

स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढविणार आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे स्वाभिमानाचे लोकसभा उमेदवार असणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढविणार आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे स्वाभिमानाचे लोकसभा उमेदवार असणार आहेत. आज स्वाभिमानीच्या झालेल्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

महेश खराडे यांच्या नावाला संस्थापक राजू शेट्टी यांनीही संमती दिली आहे. लोकसभा उमेदवार महेश खराडे यांच्यामागे पूर्ण ताकतीने उभा राहण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सांगली लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे निश्चित झाले आहे. महेश खराडे यांच्या उमेदवारीवर स्वाभिमानाच्या बैठकीत शिक्केमोर्तब झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com