व्हिडिओ
Tuljapur: तुळजाभवानीचे दागिने वितळण्यास स्थगिती
श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिने वितळवण्याला न्यायालयाची स्थागिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली होती.
श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिने वितळवण्याला न्यायालयाची स्थागिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली होती. तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोने व 2 हजार 570 किलो चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयाच्या दोन न्यायायाधीशांच्या खंडपीठने स्थगिती दिली आहे. विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदीर संस्थानला सोने चांदी वितळवायला परवानगी दिली होती. मात्र त्याला काही भाविक पुजारी यांचा विरोध होता. त्यानंतर हिंदू जनजागरण समितीने कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. तब्बल 13 वर्षानंतर राबवली जाणार होती. सोने वितळवणे प्रक्रिया मात्र आता त्याला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.