Supriya Sule: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय दिली आहे.
माझी मागणी आणि तुमच्या सगळ्यांचीच मागणी फाशीची होती. त्याला फास्ट्रेक कोर्टमध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला हवी होती ही माझी मत आहे. त्याचा मृत्यू कसा झाला आहे? त्यानी पोलिसाला अटेक केलं आहे आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारलं. पोलिसांवर अटेक करणं एवढी त्याची हिम्मत होती की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटेक करतो, त्याच्यावर गोळी चालवतो मग ही यंत्रणा करतेय काय? हे चिंताजनक आहे आणि आपल्यासाठी नाही पोलिसांसाठी कारण पोलीस पण माणसं आहेत, पोलिसांचे पण कुटुंब आहेत हे विसरुन कसं चालेल आपल्याला असं सुप्रिया सुळे म्हणाली.