व्हिडिओ
Supriya Sule : 2 हजार कोटींचा खर्च करून भाजपनं ठाकरेंचं सरकार पाडलं
सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमातून बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 1 खोका म्हणजे 1 कोटी रुपये. 50 खोक्यांनी उद्धवजींचे सरकार पाडलं.
50 खोके गुणिले 40 आमदार म्हणजे 2 हजार रुपये खर्च करुन आपल्या उद्धवजींचे सरकार पाडायचं पाप या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाने केलं. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.