व्हिडिओ
Supriya Sule | लोकशाही मराठीवर 30 दिवसांची बंदीची कारवाई, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. या निर्णयाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये चौथा खांब हा अतिशय महत्वाचा असतो आणि हा देश संविधानाने चालतो. याचा मोकळा श्वास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशी गदा पडणार असेल तर हे अतिशय दुर्देवी आहे. हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.