व्हिडिओ
ShivSena MLA Disqualification: सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (सोमवारी) एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (सोमवारी) एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली. यादरम्यान आज झालेल्या सुनावणीत शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर 31 डिसेंबरपर्यंत सगळी कारवाई पूर्ण करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल करावीत आणि दोन दिवसांत अध्यक्षांनी त्या कागदपत्रांचा निवाडा करावा आणि पुढे जावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या.