Chandrapur Lok Sabha elections 2024 : मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी
उद्या एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरातील विविध तालुका स्थानांवरून मतदान पथके नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर जाण्यासाठी सज्ज होत आहेत. सहा विधानसभा क्षेत्रात एकूण 9 हजार 322 कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्ताने मतदान पार पडेल.
विदर्भातील पाच लोकसभा क्षेत्रातील जाहीर प्रचार तोफा थंडावल्यानंतर प्रशासन प्रत्यक्ष मतदान पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरातील विविध तालुका स्थानांवरून मतदान पथके नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर जाण्यासाठी सज्ज होत आहेत. एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार या मतदारसंघात मतदान करणार आहेत.
यामध्ये 18 ते 19 या वयोगटातील सुमारे 24 हजार मतदारांचा समावेश आहे. प्रशासनाने सहा विधानसभा क्षेत्रात विशेष मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य रक्षण व सावलीच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सहा विधानसभा क्षेत्रात एकूण 9322 कर्मचाऱ्यांच्या मदतीने व सुमारे 3000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्ताने मतदान पार पडेल.