अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आज राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आज राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पगार वाढीसह विविध मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांनी आजपासून राज्यव्यापी संप करण्याचा इशारा दिला आहे.

2 लाखांहून अधिक अंगणवाडीसेविका संपावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com