Shivsena UBT चे पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन, उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांना संबोधित

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. शिवसंकल्पयील अधिवेशनाला पुण्यातून सुरुवात होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आज पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. शिवसंकल्पयील अधिवेशनाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे. गणेश कला क्रिडा येथे हा कार्यक्रम होणार आहे. जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असे पोस्टर पक्षाकडून लावण्यात आलेलं आहे. हे पोस्टर पुण्यात लावण्यात आलं आहे.

पुण्यात उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुण्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचं अधिवेशन याठिकाणी झालेलं होतं आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवशन पुण्यामध्ये होणार आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित असतील अशी माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com