व्हिडिओ
हिंगोलीत 10 धरणग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन सुरु
हिंगोलीत 10 धरणग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
गजानन वाणी, हिंगोली
हिंगोलीत 10 धरणग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा धरणग्रस्तांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल आहे, अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असल्याने अनेकांची प्रकृती खालावत आहे.
प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हिंगोली दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी धरणग्रस्तांची भेट घ्यावी अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. 65 वर्षाचा कालावधी होऊनही धरणग्रस्तांना कोणत्या सुविधा मिळाल्या नाहीत. जिल्ह्यातील 16 हजार कुटुंबापेक्षा जास्त कुटुंबांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे त्यांची प्रकृती खालावत चालली असून अन्नत्याग करणारे धरणग्रस्त आज राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.