Video | मुंबई मनपातील कमिशनचा पर्दाफाश, नगरसेवकापासून ते ज्युनियर इंजिनियर होतात मालामाल
मुंबई महापालिका (BMC) ही जगातील सर्वात भ्रष्ट संस्था असावी असा आरोप पालिकेतीलच एका कंत्राटदाराने लोकशाहीन्यूज बरोबर बोलताना केलाय. मुंबई महापालिका नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचं कुरण आहे असा आरोप केला जातो. मुंबई महापालिका कामाची कंत्राटे देत असताना नगरसेवकांपासून ते चपराशापर्यंत प्रत्येकाचं कमिशन आणि टक्केवारी ठरलेली असल्याचं एका कंत्राटदारानं लोकशाही न्यूजला सांगितलंय.
मुंबई महापालिकेतील टक्केवारीच्या सुरस कथा आजपर्यंत आपण ऐकल्या असतील. पण आजच धक्कादायक आणि दाहक वास्तव ऐकून आपणही चक्रावून जाल. कारण पालिकेतीलच एका कंत्राटदाराने ही टक्केवारी नेमकी कशी चालते याचा खुलासा केला.
तसेच सत्ताधारी शिवसेनेसंबंधी धक्कादायक बाब म्हणजे कंत्राटं देत असताना मारवाड्यांना प्राधान्य देऊन मराठी माणसाला जाणीवपूर्वक टाळलं जाते. कारण म्हणजे मराठी माणूस कमिशन देताना सहजासहजी तयार होत नाही. 5% ते 25% पर्यंत कमिशन द्यावे लागते अशी माहिती या कंत्राटदाराकडून देण्यात आली आहे.
कंत्राटात अशी मिळते टक्केवारी!
नगरसेवक 10 ते 25%
वॉर्ड ऑफिसर - 4 ते 8 %
ज्युनि.इंजि - 10 %
सब.इंजि - 8%
असि. इंजि 6 %
एक्झिक्युटिव्ह इंजि - 4% ते 8%