सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; पूल गेला वाहून

कुडाळ तालुक्यातील नारूर गावात गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस
Published by :
Team Lokshahi

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावात गुरुवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. येथील नदीला पूर आला असून या पुरात येथील पूल ढासळला आहे. यामुळे ५० ते १०० घरांचा संपर्क तुटल्याचं गावकरी सांगत आहेत. दोन गावांना जोडणारा हा पुल दुरुस्त करण्याची आणि वाहून गेलेल्या पिकांबद्दल नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com