Eknath Shinde: कोल्हापुरात भाषणादरम्यान श्रीकांत शिंदे भावूक, मुख्यमंत्री शिंदे ट्विट करत म्हणाले...

कोल्हापुरातील महामेळाव्यात श्रीकांत शिंदे भावूक झाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केरत प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

आपण एकनाथ शिंदेंना फक्त लोकांमध्ये पाहिलं आहे. त्यांनी लहानपणी आम्हाला कधीच वेळ दिला नाही. शिंदेंनी शिवसैनिकांना आपलं कुटुंब मानलं आहे, असं म्हणत कोल्हापुरातील महामेळाव्यात श्रीकांत शिंदे भावूक झाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केरत प्रतिक्रिया दिली आहे.

सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते, असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com