Dombivli Gudi Padwa: डोंबिवलीत शोभा यात्रा अत्यंत उत्साहात, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या राज्यभरत गुढीपाडव्याचा उत्साह आहे. हा सण मराठमोळ्या संस्कृतीचा आहे.
Published by :
Sakshi Patil

लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सध्या राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह आहे. हा सण मराठमोळ्या संस्कृतीचा आहे.

डोंबिवलीची शोभायात्रा खास असते. या ठिकाणी शिवकालीन शस्त्रे देखील दाखवली जातात. डोंबिवलीतील फडके रोड इथे ही शोभायात्रा दरवर्षी असते. स्वागतयात्रेच्या निमित्ताने ढोल ताशा पथक, बाईक रॅली आणि पारंपरिक वेशभूषेत नटलेली तरुणाई एकवटल्याचं पाहायला मिळतं. महिलांकडून पारंपारिक वेशभूषामध्ये बाईक रॅली काढण्यात आली आहे.

हेल्मेटबाबत जनजागृती करणाऱ्या ग्रुपचा चौपाल करण्यात आलाय. दुचाकी चालवताना रस्ते अपघात होतात यामुळे वाहनचालक दगावतो. असे प्रसंग आणि अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा असा संदेश देण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com