Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया
तयारी भरपूर केलेली आहे आणि आम्ही तयार आहोत. माला आनंद आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला आज पुन्हा तिसऱ्यांदा मिळाली आहे. शिवसैनिकांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण असतो की, शिवसैना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणे, जे माननीय पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न आपल्या समोर ठेवलं आहे, ते स्वप्न यापूर्वी भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पाहीलेलं आहे. शिवसैनिक प्रमुखांचं स्वप्न देखील विकसित भारताचं आहे. त्यामुळे या दोघांचं स्वप्नपूर्तीचे हे पुढचे 5 वर्ष आहेत, ती संधी मला मिळणार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाने काम करण्याची, तर मी हे स्वतःचं भाग्य समजतो, असं राहुल शेवाळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी म्हणाले.
दक्षिण मध्य मतदारसंघाचे सर्वांत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पुनर्विकास. हे पुनर्विकासाचे प्रश्न आपण गेल्या 10 वर्षांपासून सोडवत आहोत. बिडीडी चाळीचे पुनर्विकासन असेल, धारावीचे पुनर्विकासन असेल, निर्वासितांचा पुनर्विकासन, म्हाडाच्या वसातींचे पुनर्विकासन असेल, एसआरएचे पुनर्विकासन असेल, मोडकळीस आलेल्या इमारती, पगडी सिस्टिमच्या इमारतींचे पुनर्विकासन असेल, गावठाण कोळीवाड्याचा पुनर्विकासन असेल, त्याच बरोबर पूर्ण विभागातील प्रायव्हेट प्रोजेक्सट पुनर्विकासनाचे अडकलेले काम आहेत ते सर्वे मार्गी लाऊन त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. राज्यसरकारने याची कायदेशीर पूर्तता अगोदरच केलेली आहे. त्याचा रिजल्ट येणाऱ्या 5 वर्षात होणार आहे. त्यामुळे विकसित भारताची सुरूवात विकसित मुंबई पासून होणार आहे. 'विकसित मुंबईसे विकसित भारत' हाच आमचा एक नारा आहे, असं देखील ते म्हणाले.