व्हिडिओ
संपूर्ण देशातून घोटाळेबाज एकत्र आलेत आणि जेवणावळ सुरुय
एकीकडे मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून, दुसरीकडे महायुतीच्या आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठक आज वरळीतील एनएससीआय येथे पार पडणार आहे.
एकीकडे मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून, दुसरीकडे महायुतीच्या आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठक आज वरळीतील एनएससीआय येथे पार पडणार आहे. महायुतीमधील सर्व प्रमुख व घटक पक्ष दुपारी १२ ते ५ या वेळेत पार पडणाऱ्या बैठकीस हजेरी लावतील. या बैठकीत विभागनिहाय आढावा घेताना लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.