Share Market: बजेटच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात पडझड

शेअर बाजारात पडझड सुरुच आहे. बजेटच्या दुसऱ्या दिवशीही बाजारामध्ये लाल निशाण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 550 अंकांनी तर निफ्टी 100 अंकांनी कोसळला आहे.
Published by :
Team Lokshahi

शेअर बाजारात पडझड सुरुच आहे. बजेटच्या दुसऱ्या दिवशीही बाजारामध्ये लाल निशाण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 550 अंकांनी तर निफ्टी 100 अंकांनी कोसळला आहे. तर शेअर बाजार 80 हजारांच्या खाली आलेला आहे आणि निफ्टी 24 हजार 300 वर ट्रेड करत आहे. बजेटच्या धक्कातून अजूनही बाजार सावरलेला नाही.

काल जेव्हा बजेट सादर झाले त्यावेळेस शेअर बाजारात पडझड सुरु झाली होती. काल सेन्सेक्स 550 अंकांनी कोसळला होता तर निफ्टी 200 अंकांनी घसरला होता, ही पडझड अजूनही सुरुच आहे. दुसरा दिवस असून सुद्धा शेअर बाजार सावरलेला नाही आहे. यामुळे शेअर बाजाराला बजेटचा फटका बसत आहे. तर गुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com