Sharad Pawar : 'जरांगे, भुजबळ, हाकेंना एकत्र बसवा' ; मराठा आरक्षणावर शरद पवारांचा सरकारला सल्ला
जरांगे, भुजबळ, हाकेंना एकत्र बसवून सामूहिक निर्णय घ्या असं पवारांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणावर शरद पवार यांनी सरकारला सल्ला दिला आहे. तिघांनाही सरकारने एकत्र आणून चर्चा घडवावी असं शरद पवार म्हणाले. तर मराठा आरक्षणावरून जरांगेंसोबत मुख्यमंत्री शिंदेसह सरकारचा एक गट चर्चा करतो आणि जरांगेंना विरोध करणाऱ्यासोबत दुसरा गट चर्चा करतो. त्यामुळे त्यातून गैरसमज निर्माण होतात असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचं यावर वक्तव्य म्हणजे पळवाट असल्याचा हल्लाबोल असं प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. पवारांनी आपण आरक्षणासोबत आहोत की, विरोधात आहोत हे स्पष्टपणे सांगावे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. तर सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटलेला दिसत आहे. एकीकडे जरांगे पाटील ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी करताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे भुजबळ आणि हाके हे ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आंदोलन करताना दिसत आहेत त्यांची ही मागणी आहे आणि या पार्श्वभुमीवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात होत. त्यामध्ये शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तसेच सल्ला दिलेला आहे. तर त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलेली आहे.