व्हिडिओ
राज्यात मोठा राजकीय भूकंप! शरद पवारांना धक्का बसणार? शंभूराज देसाईंचा गौप्यस्फोट
शंभूराज देसाई यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
सातारा : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा, असे शंभूराज देसाईंना म्हंटले आहे. तसेच, दसरा-दिवाळीत नेहमीच मोठे धमाके होत असतात. यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.