Sanjay Raut : हरियाणा, काश्मीरच्या निवडणुकीवर राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले...
हरियाणा आणि काश्मीरच्या निवडणुकीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. काश्मीरसोबतच झारखंड आणि महाराष्ट्राची देखील निवडणुक करायला हवी होती पण फक्त काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या घोषणा झालेल्या आहेत, यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडणार असल्याचा आरोप ही संजय राऊत यांनी केलेला आहे.
तसेच झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडण्याचा डाव आहे आणि त्यामुळेच तिथे निवडणुकीची घोषणा झाली नाही, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर आपल्या राज्यामध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका आहेत म्हणजे सरकारची सोय असल्याचं संजय राऊत म्हणाले. राज्यामध्ये सरकार विधानसभा आणि स्थानिक निवडणुका का घेत नाहीत? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी केलेला आहे. तर निवडणुका घेण्यासाठी सरकार तयार नसेल तर ही हुकूमशाही आहे असं संजय राऊत म्हणाले.