Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवारांकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग; राऊतांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये नियम डावलून निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम प्रचार रथाचे उद्घाटन केले आहे.
Published by :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये नियम डावलून निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम प्रचार रथाचे उद्घाटन केले आहे. पुण्यातील खेड आंळदी विधानसभा मतदार संघात हा प्रकार घडला आहे. ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यासाठी हा प्रचार करण्यात आलेला आहे. तर तहसीलदार ज्योती देवरे यांनी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे. त्यामुळे हे सगळे नियम डावल्याची चर्चा दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांकडून डावलण्यात आलेल्या नियमांमुळे त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येते का याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, तहसीलदारावर काशी काय कारवाई केली? ज्याने नियम बाह्यवर्तन केलं आहे त्यांच्यावर कारवाई केली नाही. आमच्यावर कारवाई करता ना, मग निवडणूक आयोगानं आचारसंहिता नियमांचं पालन करून ज्याने हा गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई करायला हवी. पण या राज्यामध्ये कायद्याचा बडगा फक्त विरोधकांवर होत आहे सत्ताधाऱ्यांवर नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com