व्हिडिओ
Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी गुजरातची लॉबी निर्णायक असल्याचे सांगत, शपथविधी सोहळा गुजरातमध्ये घेण्याची टीका केली आहे.
मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरातची लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा गुजरातमध्ये त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले, गुजरातला मोदींच्या नावाने स्टेडियम आहे. तिथे जास्त लोक बसतात. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी सोहळा घ्यावा हे संयुक्तिक ठरेल. शिवतीर्थावर शपथविधी घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. वानखेडे स्टेडियमवर घेतला तर 106 हुतात्म्यांचा अपमान होईल. त्यामुळे त्यांनी शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.