Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात 2 तासांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सरवणकरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अल्टिमेटम दिला. सरवणकर अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
Published by :
shweta walge

काल रात्री जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात चर्चा झाली. सरवणकर आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. फॉर्म मागे घेणार नाहीत असं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याने पेच वाढला आहे. या बाबत पुन्हा एकदा विचार करा असा मुख्यमंत्री यांचा सल्ला. युतीधर्म पाळावा लागेल अशी सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली आठवण. या मोबदल्यात तुम्हाला किंवा मुलीला विधान परिषदेचीही ऑफर दिल्याची माहीती. 4 तारखेपर्यंत योग्य तो निर्णय घ्या, उमेदवारी अर्ज मागे घ्या, असा सरवणकर यांना अल्टिमेटम देण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com