Sada Sarvankar | अमित ठाकरेंनी अर्ज मागे घ्यावा, राज ठाकरे यांना भेटून विनंती करणार : सदा सरवणकर
मुंबईतील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघ म्हणजे दादर माहीम मतदारसंघ. कारण या मतदारसंघात उमेदवार आहेत ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेतून सध्याचे विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुठेतरी सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी अशा राजकीय चर्चा होत असताना 'आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा अशी विनंती करणार' असल्याचे सदा सरवनकर यांनी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
'मी निवडणूक लढवावी ही माझ्या मतदारांची भावना असून आमचं आई मुलाचं नातं आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देऊन जो मोठेपणा दाखवला तो आता सुद्धा दाखवावा अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली आहे.