Kandivali : कांदिवली समतानगरमधील पाणीटंचाईने त्रस्त रहिवाशांनी दरेकरांशी चर्चा करण्यास दिला नकार

कांदिवलीच्या समतानगरात पाण्यासाठी रहिवाशांचं आंदोलन सुरु आहे. 25 मार्चपासून रहिवाशांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप केला जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कांदिवलीच्या समतानगरात पाण्यासाठी रहिवाशांचं आंदोलन सुरु आहे. 25 मार्चपासून रहिवाशांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप केला जात आहे. वारंवार सांगूनही पाणी दिलं जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. म्हाडा इमारतीच्या पुर्नविकास झालेल्या इमारतीला कमी पाणी देत असल्याचा आरोप केला जात आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकरांकडून रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रहिवाशांकडून दरेकरांचं काहीही ऐकून घेण्यास नकार आला आहे. लोकं ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने दरेकरांना परत फिरावं लागलं. म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करून सरोवा कॉम्प्लेक्स बांधण्यात आला. समता नगरच्या 32 मजली सरोवा इमारत कॉम्पल्समध्ये 2000 कुटुंबे राहतात. आजूबाजूच्या बांधलेल्या नवीन इमारतीत बिल्डर 24 तास पाणी देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com