Pooja Khedkar IAS Updates: पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा

आज दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन प्रकरणी सुनावणी झाली. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आज दिल्ली उच्च न्यायालयात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन प्रकरणी सुनावणी झाली. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. 29 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे पूजा खेडकरला कोर्टाकडून दिलासा देण्यात आल्या आहेत.

खेडकरच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, UPSC ने दि. 20 ऑगस्ट रोजी आपल्या प्रतिज्ञापत्रात प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ आवश्यक आहे. दिल्ली हायकोर्टाने खेडकरच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात पुढील निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. 29 ऑगस्टच्या सुनावणीसाठी या प्रकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com