Relaince 5 Airports under MIDC : रिलायन्सकडील पाचही विमानतळं पुन्हा MIDCकडे
रिलायन्सकडील पाचही विमानतळं पुन्हा MIDCकडे घेण्यात आलेली आहेत. बारामती लातूरसह पाच विमानतळ MIDCच्या ताब्यात येत आहेत. इथला कामकाज बंद असल्यामुळे रिलायन्ससोबतचा करार रद्द केल्याची माहिती मिळत आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीला चालवण्यासाठी ही विमानतळ देण्यात आलेली होती त्यामध्ये बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशिव ही पाचही विमानतळ होती मात्र तिथल कामकाज बंद असल्याने MIDCने पुन्हा ही विमानतळ आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अंतर्गत विमानसेवा सक्षम व्हावी यासाठी राज्य सरकारने ती पाच विमानतळ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एयरपोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीला 95 वर्षाच्या भाडेपट्टी करारनाम्यावर दिली होती. तर यापैकी नांदेड विमानतळ स्टार एअरलाइन्स मार्फत सुरु झालेलं आहे. तर इतर विमानतळांच कामकाज ठप्प आहे. त्यामुळे महामंडळाने रिलायन्ससोबतचा करारनामा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.