रवींद्र महाजनींच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?
पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता तेथे रवींद्रचा मृतदेह होता. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. याप्रकरणी आता प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
रवींद्र महाजनी हवापालटासाठी पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमध्ये राहत होते. याच घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. रविंद्र महाजनी यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. यानुसार, त्यांच्या शरीरावर कोणत्याही तीक्ष्ण खुणा नाहीत. बॉडी बऱ्यापैकी डीकंपोज झाल्याचं प्राथमिक तपासणीत आढळून आलंय. साधारणः दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा. विसेरा राखून ठेवला असून अंतिम पीएम रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे.