रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला मारली लाथ; व्हिडीओ व्हायरल

फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारुन केलं बाजूला
Published by :
Siddhi Naringrekar

अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात काल भेट झाली. या भेटीवेळी दोघं फोटो काढण्यासाठी उभे राहिले. यावेळेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जेव्हा अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे फोटो काढायला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता रावसाहेब दानवे यांच्या बाजूला येऊन उभा राहिला.

रावसाहेब दानवे यांनी लाथ मारत कार्यकर्त्याला बाजूला केल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील येत आहेत.

नेहमी नेहमी फोटोमध्ये येतो म्हणून दानवे यांनी त्याला दूर केल्याचे सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com